पाळधी : गावात एका असहाय्य, बेवारस अवस्थेत असलेल्या स्त्री रुग्णाची माहिती मिळताच टायगर ग्रुपचे कल्पेश कोळी व सर्व ग्रुपने तत्काळ धाव घेत तिची सुश्रुषा केली.
बेवारस रुग्णाला मिळाले आपुलकीचे हात”
सदर महिला आजारी व अशक्त अवस्थेत आढळून आली होती. तिच्याकडे कोणीही विचारपूस करणारे नसल्याने टायगर ग्रुप ने तिला अन्न-पाणी पुरवले तसेच वैद्यकीय उपचार मिळवून दिले.
टायगर ग्रुपने दाखवला मायेचा आणि सेवाभावाचा धडा”
असहाय्य स्त्रीच्या डोळ्यात उमटली आशेची किरणे”
या घटनेतून मानवतेचे दर्शन घडले कल्पेश कोळी व टायगर ग्रुप दाखवलेली तत्परता व सेवाभाव कौतुकास्पद ठरत आहे.
माणुसकी अजूनही जिवंत आहे याचे जिवंत उदाहरण”
माजी जिप सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाळधी च्या जि पी एस ग्रुपने सुद्धा पुढाकार घेत महिलेच्या पुढील उपचारासाठी सर्वोतोपरी मदत करणार आहेत.
