गारखेडा येथे नवनाथ महाराज पोथी वाचन समाप्ती उत्साहात संपन्न
भक्तिमय वातावरणात मान्यवरांची उपस्थिती; सामूहिक प्रसादाने सोहळ्याचा समारोप
धरणगाव तालुक्यातील गारखेडा येथे रविवारी नवनाथ महाराजांच्या पोथी वाचन समाप्तीचा सोहळा दिंड्या, भजन व कीर्तनाच्या गजरात अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात पार पडला. सकाळपासूनच गावात भक्तिरसाची धारा ओसंडून वाहत होती. या निमित्ताने झालेल्या धार्मिक कार्यक्रमांना ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचे औचित्य साधले.
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी उपस्थित राहून नवनाथ महाराजांच्या शिकवणी व पोथी वाचनाच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमास गावातील गोटू पाटील, जगन महाजन, वीरभान पाटील, बंडू पाटील, भावेश पाटील, माजी सरपंच किशोर पाटील, कमलाकर पाटील, जिजाबराव पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सोहळ्याचा समारोप सामूहिक प्रसादाने झाला. अध्यात्मिक वातावरणाने भारावून गेलेल्या भाविकांनी संयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.
