पाळधी येथे जी.पी.एस. मित्र परिवाराचा गणेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात 

गायक, भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी होणार भक्तिमय माहोल
पाळधी (प्रतिनिधी) : पाळधी बु. येथे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिप सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जी.पी.एस. मित्र परिवार तर्फे आयोजित गणेशोत्सव २०२५ मोठ्या जल्लोषात पार पडणार असून यामध्ये दररोज आकर्षक सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी रंगणार आहे. सुप्रसिद्ध श्री खाटू शाम बाबा यांच्या मंदिराची प्रतिकृती साकारली जात आहे. गणरायाच्या आगमनानंतर गावात भक्तिभाव, संगीत आणि कलाविष्कारांचा सुरेल संगम अनुभवायला मिळणार आहे.
🔸 ३० ऑगस्ट रोजी मनोरंजन व भक्तिगीतांचा संगम
गणेशोत्सवाची सुरुवात ३० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ८ वाजता होणार असून डोंगर हिरवागार फेम खानदेश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूरचे लोकप्रिय गायक आबा चौधरी व चिराग चौधरी यांचे सादरीकरण रंगणार आहे. त्याच दिवशी सुप्रसिद्ध खान्देशी गायक गोविंद गायकवाड यांचे सुरेल गायन आणि शेतकरी पुत्र, अभिनेते अशोक पाटील यांचे विशेष आगळेवेगळे सादरीकरण होणार आहे.
🔸 ३१ ऑगस्ट रोजी भजन संध्या
३१ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता श्री खाटू शाम बाबाची भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे. यात भजन गायक दीपक प्रजापती आपल्या भजनांच्या माध्यमातून भक्तांना अध्यात्मिक अनुभूती देणार आहेत.
🔸 १ सप्टेंबर रोजी संध्याकाळ प्रसिद्ध मुस्लिम कीर्तनकार ह.भ.प. कबीर महाराज अत्तार यांच्या कीर्तनाने उजळून निघणार आहे. त्यांच्या रसाळ आणि विचारप्रवर्तक कीर्तनाने वातावरण भक्तिमय होणार आहे.
📍 कार्यक्रमाचे ठिकाण – जी.पी.एस. स्कूल, श्रीराम कॉलनी, पाळधी बु., ता. धरणगाव, जि. जळगाव
🕗 कार्यक्रमाची वेळ – दररोज संध्याकाळी ८ वाजता
या सोहळ्याच्या तयारीसाठी जी.पी.एस. मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले असून, सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
