भुसावळ : शहरातील साईजीवन सुपर शॉपमध्ये विविध किराणा मालावर विशेष सवलती व ऑफर्स सुरू झाल्याने ग्राहकांची गर्दी वाढली आहे. दैनंदिन वापरातील वस्तूंवर आकर्षक दरकपात मिळत असल्याने नागरिकांना बचतीसोबत गुणवत्तापूर्ण खरेदीचा लाभ मिळत आहे.
सुपर शॉपमध्ये तांदूळ, डाळी, तेल, साखर यांसह घरगुती वस्तूंवरही विशेष ऑफर्स दिल्या जात असून “एक खरेदी करा, एक मोफत मिळवा” अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्राहक उत्साहाने खरेदी करताना दिसत आहेत.
दुकानाचे संचालक श्री पिंटू कोठारी यांच्या
वतीने सांगण्यात आले की, “ग्राहकांना नेहमीच स्वस्त दरात दर्जेदार वस्तू उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. या ऑफर्स मर्यादित कालावधीसाठी असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा.”
