बांधकाम कामगारांना खुश खबर
आता गर्दी नाही, तुमच्या सोयीनुसार घरबसल्या गृहोपयोगी संच मिळणेसाठी तारीख निवडा
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगार बंधू भगिनींना गृहोपयोगी संच लाभ मिळणे सोपे व्हावे म्हणून http://hikit.mahabocw.in/appointment या वेबसाईटवर जाऊन
जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील कामगारांनी
*धरणगाव किंवा जळगाव ग्रामीण सेंटरच निवडावे*
ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी. 25 ऑगस्ट पासून गृहोपयोगी संच वितरणास सुरुवात होणार आहे. ऑनलाईन नोंदणी नंतर जी तारीख निवडली असेल त्या तारखेला लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे
*आधार कार्ड, बांधकाम मंडळाचे कार्ड, एक रुपयाची नोंदणी पावती, ऑनलाईन अपॉइंटमेंट लेटर, स्वयंघोषणा पत्र*
घेऊन दिलेल्या सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक ओळख व ऑनलाईन फोटो काढल्यावर गृहोपयोगी संच मिळेल.
वरीलप्रमाणे सेंटर निवड केल्यानंतर भांडे संच मिळण्याचे ठिकाण खलील प्रमाणे
1. बिलखेडे-वावडदे, ता. जि. जळगाव
2. कमल जिनिग, चोपडा रोडवर, धरणगाव
*तुमच्या सोयी सुविधे साठी कृपया धरणगाव व जळगाव ग्रामीण सेंटरच निवडावे*

बांधकाम कामगारांना खुश खबर