जळगाव (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध सुगोकी लॉन व उद्योगसमूह चे संचालक श्री. धनराज कासट यांची रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या उप प्रांतपाल (Assistant Governor) पदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल आनंदाचे वातावरण असून विविध सामाजिक, व्यावसायिक तसेच रोटरी परिवाराकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
रोटरी चळवळीतील कार्य, समाजाभिमुख उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग आणि संघटन कौशल्य या गुणांच्या आधारे श्री. कासट यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वातून रोटरीच्या सामाजिक उपक्रमांना नवे बळ व दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
