असोदा/जळगाव प्रतिनिधी दि.21 ऑगस्ट – “शेती हा फक्त परंपरागत व्यवसाय नाही, तर संस्कृतीशी जोडलेला वारसा आहे. त्या संस्कृतीतला बैलपोळा हा महत्वाचा सण आहे. यांत्रिकीकरण आलं तरीही मातीशी नाळ जोडलेले आपल्या सारखे शेतकरी आजही बैल राखून आहेत, हे आपल्या परंपरेचं वैभव आहे. या परंपरेची श्रीमंती पुढेही टिकवून ठेवू या,” असे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते असोदा येथे तुषार महाजन यांच्या संकल्पनेतून आयोजित बैलांना साज वाटप कार्यक्रमात बोलत होते.*
*अभिनव उपक्रमाचा प्रारंभ असोदा गावात*
असोदा, ममुराबाद, देऊळवाडा, सुजदे, नांद्रा खू, खापरखेडा, धामणगाव, तुरखेडा, आवार, विदगाव, रिधुर, डिक्साई, आमोदा खुर्द, घार्डी, धानोरा खुर्द, करंज, सावखेडा खुर्द अशा १६ गावांतील तब्बल १५०० शेतकऱ्यांना बैल पोळ्यानिमित्त साज वाटप करण्यात आला.
असोदा व भादली येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते साजाचे वाटप झाले. त्यानंतर इतर गावांमध्ये हा उपक्रम जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील व विक्रम पाटील यांच्या हस्ते पार पडला.
*शेतकऱ्यांचा कृतज्ञतेचा सूर*
कार्यक्रमात सामजिक कार्यकर्ते तुषार महाजन, माजी सभापती पती जनाआप्पा पाटील (कोळी), सरपंच हेमंत चौधरी (ममुराबाद), नितीन सपकाळे (तुरखेडा), किशोर चौधरी, गिरीश भोळे, राहुल ढाके, किरण सोनवणे, भगवान पाटील, रोहित कोळी, डॉ. कमलाकर पाटील, समाधान सोनवणे, चुडामण आप्पा पाटील, शिवाजी पाटील, देवेंद्र कोळी, प्रल्हाद भाऊ पुंडलीक भाऊ,लिलाधर पाटील माणिक सपकाळे,जगदीश कोळी,आकाश सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त करताना, “आजच्या काळातही आपल्या पाठीशी कोणीतरी आहे, हीच खरी ताकद आहे,” असे भावनिक उद्गार अनेक शेतकऱ्यांनी काढले.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, बैल हा शेतकऱ्याचा सच्चा मित्र असून, त्याचा सन्मान करणे ही परंपरेची श्रीमंती असून बैलांचा सन्मान म्हणजे शेतकऱ्यांची संस्कृती असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगीतले. सर्वच स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
*ठळक मुद्दे*
१६ गावांतील १५०० शेतकऱ्यांना पोळ्यानिमित्त बैल साजाचे मोफत वाटप.
उपक्रमाचे नेतृत्व तुषार महाजन व जनाआप्पा पाटील (कोळी) यांनी केले.
असोदा व भादली येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाटप.
इतर गावांमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या हस्ते वाटप.
