माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील संत सेना महाराज जयंतीला धरणगाव, पाळधी, पिंपरी उपस्थित
धरणगाव (प्रतिनिधी): धरणगाव, पाळधी व पिंपरी येथे संत सेना महाराजांची जयंती मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी उपस्थित राहून संतांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाविकांनी संतांचा जीवनप्रवास आणि त्यांचे सामाजिक कार्य यांची माहिती घेतली.
प्रतापराव पाटील यांनी संत सेना महाराजांच्या विचारांचे समाजाला आजही मार्गदर्शन करणारे असल्याचे सांगितले. यावेळी स्थानिक मान्यवर, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
