अहिरे, चमगाव आणि पाळधी या गावांच्या देवीच्या मशाली आणण्याचा पारंपरिक सोहळा मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात पार पडला. मशाल आणताना मार्गात शेकडो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील व माजी पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील यांनी भाविकांशी भेट घेऊन त्यांच्या श्रद्धा-अस्था जाणून घेतल्या. गावोगावी भक्तिमय वातावरणात एकात्मतेची भावना ओसंडून वाहताना दिसून आली.
या सोहळ्यामुळे समाजातील धार्मिक परंपरा अधिक बळकट होत असून गावागावांमध्ये श्रद्धा, भक्तिभाव आणि ऐक्य दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
