*“गावातील प्रत्येक कुटुंबाचा विकास हीच खरी पंचायतची ताकद ” – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

वराड बुद्रुक येथे ग्रामपंचायत कार्यालय व स्वच्छतागृहाचे लोकार्पण; सेवा पंधरवड्यात विविध लाभांचे वाटप
*जळगाव प्रतिनिधी दि. २० सप्टेंबर – “ग्रामपंचायत हे गाव विकासाचे मंदिर असून गावाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे. गावातील प्रत्येक कुटुंबाचा विकास हीच खरी पंचायतची ताकद आहे. सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचत असल्याचा मनस्वी आनंद आहे. महिलांनी लहानमोठे उद्योग उभे करून ‘लखपती दीदी’ व्हावे. मंत्रिपदाची गरिमा जपत मी आपला भाऊ म्हणून जबाबदारी पार पाडत असतो. गावोगावी केलेल्या विकासकामातून मिळणारे प्रेम मी कधीही विसरणार नाही असे भावनिक प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी भूषवले.*

१७ सप्टेंबर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते २ ऑक्टोबर म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या काळात ‘सेवा पंधरवडा’ राज्यभर राबविला जात आहे. या निमित्ताने वराड बुद्रुक येथे ग्रामपंचायत कार्यालय आणि महिला-पुरुषांसाठी बांधलेले स्वच्छतागृह यांचे लोकार्पण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शनिवारी पार पडले. यावेळी सेवा पंधरवडा निमित्त गावातील पात्र व गरजू व्यक्तींना रेशनकार्ड, जातीचे प्रमाणपत्र अश्या विविध लाभांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपतालुका प्रमुख संदीप सुरळकर यांनी केले तर सूत्रसंचालन बी. बी. धाडी सर यांनी केले. आभार विकास जाधव यांनी मानले.
*मान्यवरांची उपस्थिती*
या वेळी तहसीलदार शितल राजपूत, नायब तहसीलदार प्राजक्ता केदार, सरपंच कविताबाई सपकाळे, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख सरिताताई माळी – कोल्हे, सरपंच कविताबाई सपकाळे, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, उपजिल्हाप्रमुख रवी कापडणे, अनिल भोळे, माजी जि.प. सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी, राजेंद्र चव्हाण, दूध संघ संचालक रमेश आप्पा पाटील, ग्रा.पं. सदस्य संदीप सुरळकर, विकास पाटील, राजेंद्र जाधव, शरद जाधव, जितेंद्र पाटील, साहेबराव वराडे, धोंडू जगताप, गोविंदा पवार, समाधान चिंचोले, सोसायटी चेअरमन जगदीश जाधव, व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर सुरडकर, ग्रामसेवक नारायण खोडपे, माधव सपकाळे, निलेश जाधव, सीआरपी सीमा जाधव, विठ्ठल काळे तसेच पंचक्रोशीतील सरपंच, पदाधिकारी, महिला बचत गटाच्या महिला, शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
