पाळधी (ता. धरणगाव) –
नवरात्रीचा गंध हवेत दरवळू लागला आहे. गावागावातून ढोल-ताशांचा आवाज, देवीच्या आरतीचे स्वर आणि रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखांची चाहूल लागली आहे. या उत्सवी वातावरणात पाळधी गावात पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील व माजी जिप सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत GPS ग्रुप तर्फे आयोजित मोफत दांडिया व गरबा प्रशिक्षण शिबिराला सुरुवात होत आहे.
१५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२५ या सहा दिवसांत दुपारी ४ ते ६ या वेळेत GPS शाळेच्या मैदानावर युवक-युवती, महिला व पुरुष एकत्र जमून दांडिया-गरब्याचे ताल शिकणार आहेत. प्रशिक्षणाद्वारे नवरात्रीच्या पारंपरिक नृत्यकलेतील विविध हालचाली, आकर्षक स्टेप्स आणि गरब्याच्या लयबद्धतेचे बारकावे शिकवले जाणार आहेत.
गावातील छोट्या मुलांपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांसाठी खुले असलेल्या या शिबिरामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वलय पसरले आहे. नवरात्रीच्या दिवसांत रंगीबेरंगी पोशाख, वाजणारे ढोल-ताशे आणि तालावर डोलणारी पावले यामुळे पाळधी गावाची रात्र उजळून निघेल, अशी अपेक्षा आहे.
या शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक असून अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२५ आहे. नावनोंदणीसाठी साई मोबाइल शॉपी व जय अंबे डेअरी येथे संपर्क साधावा. संपर्क क्रमांक : ७५१७५०९०९०
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी सांगितले की, “नवरात्री हा केवळ सण नसून भक्ती, परंपरा आणि एकतेचा उत्सव आहे. दांडिया-गरबा प्रशिक्षणाद्वारे गावातील प्रत्येकाला आपली कला सादर करण्याची संधी मिळेल आणि नवरात्रीचा खरा उत्सव अनुभवता येईल.”
👉 स्थान: GPS स्कूल ग्राउंड, पाळधी
👉 कालावधी : १५ ते २० सप्टेंबर २०२५
👉 वेळ : दुपारी ४ ते ६
