कवठळ येथे वर्षभरात दुसरे सभागृहाचे बांधकाम सुरू
✨ गावाची प्रगती – गावकऱ्यांच्या स्वप्नांना आकार– ना. गुलाबराव पाटील यांच्या विकासकामांचा धडाका
कवठळ (जळगाव) : कवठळ गावाची स्वप्नं आता प्रत्यक्षात उतरत आहेत. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून मागील वर्षी एका सभागृहाचे काम पूर्ण होऊन लोकार्पण झाले आता वर्षभराच्या आत दुसऱ्या सभागृहाचे बांधकाम सुरू झाले असून, हा क्षण गावाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जाईल, अशी ग्रामस्थांची भावना आहे.
सामाजिक-सांस्कृतिक केंद्राला नवा उजाळा
सभागृह हे फक्त विटा–सिमेंटचे बांधकाम नसून ते गावकऱ्यांच्या एकतेचे, संवादाचे आणि संस्कृतीचे मंदिर असते. कवठळमध्ये सुरू झालेले दुसरे सभागृह आता ग्रामसभा, सामाजिक कार्यक्रम, सांस्कृतिक जत्रा व शैक्षणिक उपक्रमांचे नवे व्यासपीठ ठरणार आहे.
ग्रामस्थांचा आनंद आणि कृतज्ञता
गावात सुरु झालेल्या या कामामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
कवठळचे रहिवासी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नाटेश्वर पवार यांनी भावनिक शब्दांत प्रतिक्रिया देताना म्हटले –
“गावाला नवा चेहरा देण्यासाठी जी धडपड केली जात आहे, ती आम्ही रोज अनुभवतो. सभागृह हे आमच्या प्रगतीचे प्रतिक आहे. यासाठी आम्ही ना. गुलाबराव पाटील यांचे सदैव ऋणी राहू.”
विकासाचा वेग – अभिमानाची गोष्ट
फक्त वर्षभरात दुसरे सभागृह सुरू होणे ही गोष्टच गावकऱ्यांसाठी अभिमानाची आणि प्रेरणेची आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेली रस्ते, शाळा, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा योजना, सभागृहे अशा असंख्य कामांची मालिका गावोगाव नव्या विकासाची गाथा लिहित आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष नाटेश्वर पवार, मिलिंद मोकाशे, निलेश मोकाशे, कॉन्ट्रॅक्टर किशोर राघो पाटील जितेंद्र मोकाशे, माधव पाटील, किशोर मोकाशे, रविंद मोकाशे, प्रकाश मोकाशे, गोलू मोकाशे व ग्रामस्थ पस्थित होते.