
शब्द आणि कृतीचा मेळ
जळगाव तालुका :
आसोदा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच सुनील पाटील यांनी अवघ्या महिन्याभरातच ग्रामस्थांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे.पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव लातील, पंचायत समिती सदस्य तुषार महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना “शब्द हा आमच्या कृतीचा पाया असेल” अशी शपथ घेतलेल्या उपसरपंचांनी शब्दाला जागून गावात विकासकामांचा धडाका लावला आहे.

सुरुवातीला हातात घेतलेली कामे
गावातील रस्ते, स्ट्रीट लाईट, हायमास्ट, सुरळीत पाणीपुरवठा, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, नाली सफाई, तुटलेले ढापे दुरुस्ती, तहसीलमधील अडलेली कामे अशा प्राथमिक सोयी सुविधा उभारणीला प्राधान्य देत अवघ्या महिन्याभरात अनेक कामांना प्रारंभ झाला आहे. ग्रामस्थांच्या लहानसहान गरजाही तत्परतेने पूर्ण करण्याचा संकल्प उपसरपंच सुनील पाटील यांनी केला आहे.

ग्रामस्थांचा विश्वास दुणावला
गावकऱ्यांनी भावनिक शब्दांत प्रतिक्रिया देताना म्हटले –
“ सुनील पाटील यांनी जे वचन दिलं होतं, त्याला अवघ्या महिन्यात प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली आहे. आमच्या अपेक्षा पूर्ण होतात याचा आनंद आहे.”

प्रामाणिक कार्यपद्धतीचे कौतुक
स्थानिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिकांनी उपसरपंचांच्या प्रामाणिक आणि तातडीच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना, “गावाच्या विकासासाठी ही ऊर्जा आणि तत्परता कायम राहो” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

🌟 उपसरपंच पदी निवड म्हणजे जबाबदारी आणि शब्दपूर्ती म्हणजेच त्या जबाबदारीचा मान राखणं – आसोदा ग्रामस्थ या नव्या नेतृत्वात ही ताकद पाहत आहे.

