पक्ष संघटन डिजिटल माध्यमातून अधिक बळकट करण्याची ग्वाही
आव्हाणे (ता. जळगाव) : आव्हाणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. राकेश चौधरी यांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या जळगाव लोकसभा क्षेत्राच्या सोशल मीडिया प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, महिला आघाडी प्रमुख सरिता ताई कोल्हे तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली.
डिजिटल प्रचार मोहीमेला गती देणे, युवकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाशी जोडणे आणि संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने चौधरी यांच्यावर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या नियुक्तीनंतर आव्हाणे व परिसरात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. राकेश चौधरी म्हणाले की, “पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब व जिल्हाप्रमुख तसेच पदाधिकाऱ्यांनी दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन. सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्ष धोरणे, उपक्रम आणि जनतेशी थेट संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”

